पिंपरी (पुणे) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून पवना, मुळा आणि इंद्रायणी या ३ नद्यांच्या निळ्या पूररेषेतील बांधकामांचे नुकतेच सर्वेक्षण करण्यात आले. सर्वेक्षणामध्ये आढळलेल्या बांधकामापैकी अनधिकृत व्यावसायिक बांधकामांवर महापालिकेकडून कारवाईला प्रारंभ करण्यात आला.
अतिक्रमण विभागाने ‘ब’, ‘ड’, ‘इ’ क्षेत्रीय कार्यालयांच्या कार्यक्षेत्रामधील २७ अनधिकृत व्यावसायिक बांधकामे पाडली. यापुढे संपूर्ण बांधकामे हटवण्यात येणार असल्याचे अतिक्रमण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
महापालिकेच्या ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयामध्ये ६ अनधिकृत व्यावसायिक बांधकामांतर्गत ५ सहस्र ५०० चौरस फूट क्षेत्र पाडण्यात आले. ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयामध्ये ११ अनधिकृत बांधकामांतर्गत अंदाजे १६ सहस्र चौरस फूट क्षेत्र पाडण्यात आले. याचबरोबर, ‘इ’ क्षेत्रीय कार्यालयामध्ये १० अनधिकृत व्यावसायिक बांधकामांतर्गत अंदाजे १६ सहस्र ४०० चौरस फूट क्षेत्र पाडण्यात आले.
संपादकीय भूमिकाअनधिकृत बांधकामे का होतात ? हेही पहायला हवे ! |