महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्येचे प्रकरण
कोलकाता – येथील ‘राधा-गोविंद’ कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरावरील बलात्कार(Rape) आणि हत्या(Murder) यांच्या निषेधार्थ विद्यार्थी अन् कामगार संघटना यांनी २७ ऑगस्ट या दिवशी नबन्ना(Nabanna)येथे मोर्चा काढला. नबन्ना हे बंगाल सरकारचे सचिवालय आहे. या वेळी आंदोलकांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee)यांच्या त्यागपत्राची मागणी केली.
कोलकाता पोलिसांनी मोर्चा अवैध घोषित करत आंदोलकांना नबान्नाकडे जाण्यापासून रोखण्यासाठी ६ सहस्र पोलिसांचा फौजफाटा तैनात केला. हावडा आणि कोलकाता यांना जोडणारा हावडा पूल प्रशासनाने बंद केला होता. पाण्याचा मारा, वज्र वाहन आणि ‘क्विक रिस्पॉन्स टीम’ (क्यु.आर्.टी.) देखील तैनात करण्यात आले होते. राज्य सचिवालय नबन्नाजवळ जमावबंदी लागू करण्यात आली होती. पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी त्यांच्यावर पाण्याचा फवारा मारला, तसेच लाठीमारकेला. काही आंदोलकांना पोलिसांनी कह्यात घेतल्याचे वृत्त आहे.