‘१५.७.२०२४ या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात मी सनातन संस्थेच्या ४८ व्या संत पू. निर्मला दातेआजी (वय ९१ वर्षे) यांचे दर्शन घेतले. तेव्हा मला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. पू. आजींना नमस्कार करतांना ‘गुरुदेवांची (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची) भेट होत आहे’, असे मला वाटले आणि माझा भाव पुष्कळ जागृत झाला.
२. माझे मन निर्विचार झाले. तिथे मला स्थिरता आणि शांतता जाणवली. तेव्हा मला स्वतःचे अस्तित्व जाणवत नव्हते.
३. ‘पू. आजींचा नामजप अखंड चालू आहे’, असे मला वाटले.
४. ‘पू. आजी रहात असलेली खोली दैवी असून तेथे ईश्वराचे वास्तव्य आहे’, असे मला जाणवले.
‘हे सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊली, पू. दाते आजी यांच्याप्रमाणे आमच्यातही तुमच्या श्रीचरणांप्रति भाव, भक्ती, श्रद्धा आणि तळमळ प्रत्येक क्षणाला वाढू दे’, हीच प्रार्थना आहे.’
– श्री. शिवप्रसाद कब्बुरे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.७.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |