वारीच्या मार्गावर पाण्याच्या रिकाम्या बाटल्या गोळा करण्यासाठी लोखंडी पिंजरे !

पंढरपूर – प्लास्टिक कचरा संकलन करण्यासाठी पालखी मार्गावर जागोजागी पिंजरे ठेवले जाणार आहेत. यंदाची वारी ‘निर्मल वारी’ म्हणून प्रशासन प्रयत्न करत असून त्याचाच भाग म्हणून लोखंडी जाळीचे पिंजरे सिद्ध केले आहेत. हे पिंजरे वारी संपल्यावर शाळा, महाविद्यालय, ग्रामपंचायत येथे वापरता येणार आहेत.

गटविकास अधिकारी सुशील संसारे, सरपंच धनश्री साळुंखे, उपसरपंच चंद्रकांत चव्हाण, माजी सरपंच कविता पोरे, माजी उपसरपंच संजय लेंगरे यांच्या हस्ते पूजा करून हे पिंजरे बसवण्यात आले. या संदर्भात गटविकास अधिकारी सुशील संसारे म्हणाले, ‘‘भाविकांनी प्लास्टिकच्या बाटल्या यात टाकून निर्मल वारीसाठी सहकार्य करावे.’’

आषाढी वारीसाठी १० सहस्र पोलिसांचा बंदोबस्त ! 

वारीसाठी १० सहस्र पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. यात १ पोलीस अधीक्षक, ८ अपर पोलीस अधीक्षक, २५ पोलीस उपायुक्त, ८७ पोलीस निरीक्षक, ३८५ साहाय्यक पोलीस निरीक्षक, ५ सहस्र २७८ पोलीस कर्मचारी , राज्य राखीव पोलीस दलाच्या ६ तुकड्या, ३ सहस्र २०० होमगार्ड , १ सहस्र ६०० ग्रामसुरक्षारक्षक, तसेच पोलीस मित्रांचा समावेश आहे.