बकरी ईदच्या निमित्ताने झालेल्या पशूहत्येचा परिणाम
कारवार – हिंदु समाजासाठी पवित्र असलेल्या भटकळ येथील कोकती तलावात रक्तमिश्रित पाणी वहात आहे. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कोकती शहराच्या आजूबाजूच्या घरांतूनच बकर्या आणि अन्य पशू यांचे रक्त गटारातून वहात पवित्र कोकती तलावाच्या पाण्यात मिसळले आहे. धार्मिक क्षेत्राशी संबंधित कोकती तलावात रक्तमिश्रित पाणी मिसळलेले पाहून हिंदु समाज संतप्त झाला आहे.
Blood seepage due to the animal slaughtering on Bakri Eid pollutes the sacred Kokti lake water in Bhatkal, Karnataka.
👉 Environmentalist object Ganpati Murti Visarjan, labelling it a traditional act of water pollution.
Why aren’t they not seen now when there is literally a… pic.twitter.com/Gwv3mzbmHe
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 22, 2024
१. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांत प्रसारित झाल्यावर त्या ठिकाणी हिंदु संघटनांचे कार्यकर्ते एकत्र झाले. विशेषत: गोंड समुदायाला पवित्र असलेला हा तलाव मलिन करणे हे हिंदूंच्या धार्मिक भावनेला धक्का पोचवणारे आहे.
२. या घटनेविषयी माहिती मिळताच नगर परिषदेच्या अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. गटारनिर्मिती प्राधिकरणाच्या अधिकार्यांनी प्रथम तलावात वहात येणारे रक्तमिश्रित पाणी थांबवले. त्यानंतर गटारात साचलेले रक्तमिश्रित पाणी टँकरच्या माध्यमातून दुसरीकडे नेऊन टाकले.
३. ‘या प्रकरणी आरोपींच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल’, असे अधिकार्यांनी सांगितले.
हिंदूंसाठी पवित्र असलेला कोकती तलाव
कोकती तलावाच्या बाजूला गौंड समाजाचे मंदिर आहे. गौंड समाजाची प्रतिवर्षी या ठिकाणी यात्रा भरते. येथील मंदिरामध्ये या समाजातील लोकांकडून साकडे घातले जाते. त्यामुळे मंदिर आणि त्याच्या बाजूला असलेला हा तलाव येथील हिंदूंसाठी पूजनीय आहे.
संपादकीय भूमिकागणेशोत्सवाच्या काळात हिंदूंनी वहात्या पाण्यात श्री गणेशमूर्तीचे विसर्जन केल्यास प्रदूषण झाल्याचे आरोळी ठोकणारे कथित पर्यावरणवादी अशा वेळी कुठल्या बिळात लपलेले असतात ? |