नवी देहली – राजधानी देहलीतील तिहार कारागृहात टोळीयुद्धाची घटना समोर आली आहे. दोन टोळ्यांमध्ये झालेल्या भांडणात एका बंदीवानावर चाकूद्वारे आक्रमण करण्यात आले. तिहार कारागृहात गोगी आणि टिल्लू या प्रतिस्पर्धी टोळ्यांच्या सदस्यांमध्ये हाणामारी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. ( हे पोलिसांना लज्जास्पद ! – संपादक)
या संदर्भात एका अधिकार्याने सांगितले की, ५ जूनला सकाळी ११.१५ वाजण्याच्या सुमारास गोगी टोळीचा सदस्य असलेला हितेश, तसेच टिल्लू ताजपुरिया टोळीतील २ सदस्य यांच्यामध्ये भांडण झाले. यामध्ये बंदीवान हितेश याच्यावर वार करण्यात आले. हितेशवर आक्रमण करणार्यांची नावे गौरव लोहरा आणि गुरिंदर अशी आहेत. हितेशला दुखापत झाली असून त्याला रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात याच कारागृहात गुंड ताजपुरिया याची प्रतिस्पर्धी टोळीतील अनेकांनी भोसकून हत्या केली होती. (या घटनेनंतरही जागे न झालेले पोलीस आणि सरकारी यंत्रणा ! – संपादक)
संपादकीय भूमिकाकारागृहात चाकू कसा काय पोचतो ? कारागृह आरोपींना बंदिस्त करण्याचे ठिकाण असतांना तेथेच आरोपी गुन्हेगारी कृत्य करत असतील, तर कारागृहाचा उपयोग काय ? या घटनेला उत्तरदायी असणार्या संबंधित पोलिसांनाच आता कारागृहात टाकले पाहिजे ! |