‘जागो’ हे सदर यापुढे प्रसिद्ध केले जाणार नाही !

साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती !

राष्ट्र आणि हिंदु धर्म यांवर होणारे आघात साध्या लघुसंदेशाद्वारे (SMS द्वारे) प्रतिदिन वाचक, हिंदुत्वनिष्ठ आदींपर्यंत पोहचवून त्यांच्यात जागृती करावी, या उद्देशाने दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून ‘जागो’ हे सदर प्रसिद्ध केले जात होते. तथापि आजच्या काळाला अनुसरून राष्ट्र आणि हिंदु धर्म यांवर होणारे आघात तत्परतेने वाचकांपर्यंत पोचवण्यासाठी दैनिक‘सनातन प्रभात’चे संकेतस्थळ, तसेच ट्विटर, व्हॉट्सअ‍ॅप, टेलीग्राम आदी सामाजिक माध्यमांवरील आमची अधिकृत खाती प्रतिदिन कार्यरत आहेत. त्यांद्वारे राष्ट्र-धर्मावरील आघात वाचकांपर्यंत अधिक जलदगतीने पोचवणे शक्य असून हा पर्याय सर्वांच्या दृष्टीने अत्यंत सुलभही आहे. त्यामुळे दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये आतापर्यंत पृष्ठ २ वर प्रसिद्ध केला जाणारे ‘जागो’ हे सदर यापुढे प्रसिद्ध केले जाणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी. – संपादक