साधकांना भोगाच्या पलीकडचा आनंद अनुभवायला देऊन त्यांना मोक्षमार्गावरून चालवणारे
मोक्षगुरु सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
‘ज्ञानशक्तिसमारूढस्तत्त्वमाला विभूषितः ।
भुक्तिमुक्तिप्रदाता यस्तस्मै श्रीगुरवे नमः ॥ – गुरुगीता, श्लोक ७२
अर्थ : आत्मज्ञानाच्या शक्तीवर आरूढ झालेल्या, तत्त्वज्ञानाच्या समुदायाने अलंकृत असलेल्या, भोग आणि मोक्ष देणार्या श्री गुरूंना नमस्कार असो.’
भावार्थ : ‘आत्मज्ञानरूपी शक्तीवर ज्यांचे अधिपत्य आहे, संपूर्ण जगातील सर्व तत्त्वरूपी ज्ञानाने ज्यांचे कार्य अलंकृत झाले आहे, असे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले एकमात्र मोक्षगुरु आहेत. भुक्ती (भोग) भोगत असतांना मुक्तीचेही ज्ञान देणारे आणि साधकांना मोक्षप्राप्तीच्या मार्गावरून बोट धरून चालवणारे मोक्षगुरु सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी कोटीशः नमन !’
– श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ (५.५.२०२३)