१२ सप्टेंबर : १२५ वा सारागढीदिन

दिनविशेष

आज १२५ वा सारागढीदिन

१२ सप्टेंबर १८९७ या दिवशी ब्रिटीश भारतीय लष्कर (शीख सैनिक) आणि अफगाणी सैन्य यांच्यात सारागढीचे युद्ध लढले गेले. हे युद्ध उत्तर-पश्चिम फ्रंटियर प्रांतात (आताच्या पाकिस्तानात) झाले. ब्रिटीश भारतीय सैन्य तुकडीत २१ शीख सैनिक होते. हे सैनिक सारागढी गडावर तैनात होते. या गडावर सुमारे १० सहस्र अफगाणांनी सैनिकांनी आक्रमण केले. हवालदार इशर सिंह यांच्या नेतृत्वाखाली शिखांनी पराजय पत्करण्यापेक्षा लढून मृत्यूस सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. यामुळे काही लष्करी इतिहासकारांनी या लढाईला इतिहासातील सर्वांत महान लढ्याची उपमा दिली आहे. शीख सैनिकांच्या शौर्याचा हा दिवस भारतीय सैन्यातील शीख रेजिमेंटकडून साजरा केला जातो.