१. ‘व्यक्तीमध्ये सर्व गुण भगवंताकडून येतात आणि व्यक्तीकडून सर्व योग्य कृती भगवंतच करवून घेत असतो. मग भगवंताने जे काही दिले आहे किंवा जे केले आहे, त्यासाठी व्यक्तीला ‘आपली स्तुती व्हावी’, असे का वाटते ?
२. जेव्हा काहीतरी चांगले घडते, तेव्हा आपण कृतज्ञता व्यक्त करायला हवी आणि स्वतःत आणखी पालट होण्यासाठी सतत प्रयत्नरत रहायला हवे, अन्यथा जे चांगले घडले, त्याविषयी कौतुकाची अपेक्षा करणे कर्तेपणाचा अहंकार दर्शवते.
३. ‘सर्वकाही भगवंतानेच केले आहे’, हे अनुभवण्यासाठी प्रत्येक कृती शरणागतभावाने करायला हवी.
४. काही वेळा परिस्थिती आपल्या क्षमतेच्या बाहेर असते किंवा काही वेळा आपल्याला कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागते. अशा प्रसंगांत व्यक्तीला स्वतःमध्ये शरणागती वाढण्यास साहाय्य होते. एखादी परिस्थिती सर्वसामान्य असेल, तेव्हा ती परिस्थिती हाताळतांना व्यक्तीमध्ये कर्तेपणा असतो; मात्र तीच परिस्थिती जर कठीण असेल, तर त्या परिस्थितीला सामोरे जाण्यास देवाचे साहाय्य मिळावे; म्हणून व्यक्ती शरणागतभावात रहाते.’
– श्री हनुमान ((पू.) श्री. देयान ग्लेश्चिच (युरोप) यांच्या माध्यमातून) (३.११.२०२१)
|