भारतविरोधी दुष्प्रचार करणार्‍या वृत्तसंकेतस्थळांना ‘इंडियन अमेरिकन मुस्लिम कौन्सिल’कडून पुरस्कार !

  • ‘भारतातील मुसलमान संकटामध्ये आहेत’, असा या अमेरिकी संघटनेकडून दुष्प्रचार !

  • ‘द वायर’, ‘न्यूजलाँड्री’, ‘स्क्रोल’ आणि ‘द कारवा’ या वृत्तसंकेतस्थळांच्या पत्रकारांचा समावेश !

वॉशिंग्टन – ‘इंडियन अमेरिकन मुस्लिम कौन्सिल’ (भारत अमेरिका इस्लामी परिषद) या भारतद्वेषी संघटनेने भारतविरोधी आणि हिंदुविरोधी लिखाण करणार्‍या ‘द वायर’, ‘न्यूजलाँड्री’, ‘स्क्रोल’ आणि ‘द कारवा’ या वृत्तसंकेतस्थळांना लाखो रुपयांचे पुरस्कार प्रदान केले. या संकेतस्थळांच्या पत्रकारांना भारतविरोधी प्रोपेगेंडा (धोरण) पुढे नेण्यासाठी प्रोत्साहनार्थ म्हणून हे पैसे देण्यात आले आहेत. संबंधित सर्व वृत्तसंकेतस्थळे इस्लामवादी आणि पाकिस्तानप्रेमी आहेत. ती भारताच्या विरोधात दुष्प्रचार करण्यात मग्न असतात. त्यांच्याकडून ‘भारतातील मुसलमानांना मोदी सरकार घाबरवत आहे’, असा दुष्प्रचार चालवला जात आहे.

हे आहेत भारताच्या विरोधात वार्तांकन करणारे पुरस्कार मिळालेले पत्रकार !

• ‘द कारवा’ नियतकालिकाचे शाहिद तांत्रे आणि सुमेधा मित्तल
• ‘स्क्रोल’च्या ऐश्‍वर्या एस्. अय्यर
• ‘द वायर’च्या इस्मत आरा आणि नाओमी बार्टन
• ‘द न्यूज मिनट’च्या प्रियांका तिरुमूर्ती
• ‘न्यूजलाँड्री’च्या आकांक्षा कुमार

भारताला काळ्या सूचीत टाकण्याची मागणी करणारी अमेरिकेतील संघटना ‘इंडियन अमेरिकन मुस्लिम कौन्सिल’ !

• ‘इंडियन अमेरिकन मुस्लिम कौन्सिल’ या अमेरिकेतील मुसलमान संघटनेला भारतातील हिंदुविरोधी ‘जमात-ए-इस्लामी’चा पाठिंबा आहे. ही संघटना भारतीय मुसलमानांच्या कथित अधिकारांचे समर्थन करते. ही संघटना अमेरिकेत ‘भारतातील मुसलमान संकटामध्ये आहेत’, असे वातावरण निर्माण करत आली आहे. भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर काळ्या सूचीत टाकण्याची मागणीही या संघटनेने केली आहे.
• जानेवारी २०२२ मध्ये भारताचे माजी उपराष्ट्रपती हामिद अंसारी आणि हिंदुद्रोही अभिनेत्री स्वरा भास्कर हे या भारतविरोधी संघटनेच्या एका कार्यक्रमात अतिथी म्हणून सहभागी झाल्याने दोघांना भारतियांकडून पुष्कळ विरोध झाला होता.

संपादकीय भूमिका

  • ‘इंडियन अमेरिकन मुस्लिम कौन्सिल’कडून हिंदुविरोधी आणि भारतद्वेषी पत्रकारांना पुरस्कार देण्यात येणे, यात काय आश्‍चर्य !
  • भारतविरोधी वार्तांकन करणार्‍या सर्व वृत्तसंकेतस्थळांवर केंद्रशासनाने कठोर कारवाई करणे अपेक्षित !