महंमद पैगंबर यांचा अवमान करणार्‍यांचा आम्ही सूड उगवू !  

  • बूंदी (राजस्थान) येथील मौलाना मुफ्ती नदीम अख्तर याची धमकी

  • भाजपच्या प्रवक्त्या नूपुर शर्मा यांनी महंमद पैगंबर यांच्याविषयी केलेल्या कथित अवमानाचे प्रकरण

भाजपच्या प्रवक्त्या नूपुर शर्मा (डावीकडे) मौलाना मुफ्ती नदीम अख्तर (उजवीकडे)

बूंदी (राजस्थान) – जर कुणी महंमद पैगंबर यांच्याविरोधात बोलत असेल आणि त्याच्यावर कारवाई होत नसेल, तर मुसलमान समाज संपूर्ण देशात त्यांची प्रतिक्रिया व्यक्त करील. ही विनंती नाही, तर उघड चेतावणी आहे. आम्हाला सूड उगवणे चांगल्या प्रकारे येते, हे इतिहासातून तुम्हाला लक्षात येईल, अशी धमकी येथील मौलाना मुफ्ती नदीम अख्तर याने दिली आहे. भाजपच्या प्रवक्त्या नूपुर शर्मा यांनी एका वृत्तवाहिनीवरील चर्चासत्रात पैगंबर यांचा कथित अवमान करणारे विधान केल्यावरून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी येथील मुसलमानांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करून केली. त्या वेळी मौलाना नदीम अख्तर बोलत होता.

सौजन्य : Zee News

हात-पाय तोडू, डोळे काढू, हात कापून टाकू !

मौलाना नदीम अख्तर पुढे म्हणाला की, आम्ही पैगंबर यांच्या विरोधात एक शब्दही ऐकून घेऊ शकत नाही. आम्हाला, आमच्या आई-वडिलांना शिवी द्या; पण महंमद पैगंबर यांच्याविरोधात आम्ही काहीही ऐकून घेणार नाही. जर कुणी बोलेल, तर त्याची जीभ कापून टाकू. कुणी डोळे दाखवत असेल, तर डोळे काढून टाकू, बोट दाखवत असेल, तर बोटे तोडून टाकू, हात उठवत असेल, तर हात कापून टाकू, त्यासाठी आम्हाला कारागृहात जावे लागले, तरी चालेल. आम्ही जेव्हा जेव्हा कुणाच्या विरोधात आवाज उठवला आहे, तेव्हा तेव्हा तो वाचलेला नाही, हे इतिहासात पाहू शकता.

पोलिसांकडून मौलानाला नोटीस

बूंदी पोलिसांकडून मौलाना नदीम अख्तर आणि अन्य तिघांच्या विरोधात ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली आहे. बूंदी कोतवाली पोलीस ठाण्याचे प्रमुख सहदेव मीणा यांनी सांगितले की, सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारचे भाषण करणे चुकीचे आहे. आम्ही बंदू शहरातील वातावरण बिघडवू देणार नाही.

संपादकीय भूमिका

  • राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार असल्यामुळे तेथे मुसलमानांचे असे बोलण्याचे धाडस होते, हे लक्षात घ्या ! काँग्रेस सरकार या मौलानावर कारवाई करून धर्मनिरपेक्षता दाखवणार का ?
  • हिंदूंच्या देवतांचा अवमान करणार्‍यांच्या विरोधात हिंदू वैध मार्गानेही कारवाई करण्याची मागणी करत नाहीत, तर मुसलमान थेट कायदा हातात घेण्याची धमकी देतात आणि अनेकदा तसे करतातही !