‘राष्ट्रीय शैक्षणिक, संशोधन आणि प्रशिक्षण मंडळा’च्या (‘एन्.सी.ई.आर्.टी.’च्या) ७ वी इयत्तेतील ‘सोशल आणि पॉलिटीकल लाईफ-२’ या नवीन पाठ्यपुस्तकात आधुनिक वैद्यांना अपकीर्त करणार्या लिखाणाचा समावेश करण्यात आल्याने याचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटत आहेत. या लिखाणाला तंबाखू निर्मूलन संघटना आणि भारतीय वैद्यकीय संघटनेचा गोवा विभाग यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.
पाठ्यपुस्तकातील या लिखाणात अयोग्य काय ?
‘सोशल आणि पॉलिटीकल लाईफ-२’ या नवीन पाठ्यपुस्तकात ‘अधिक पैसे कमावण्यासाठी काही खासगी सेवा देणारे आधुनिक वैद्य अयोग्य कृती करतात. या वेळी अल्प खर्चाचा पर्याय उपलब्ध असतांनाही त्याचा वापर केला जात नाही, उदाहरणार्थ गोळ्या किंवा स्वस्तात औषध उपलब्ध असतांना आधुनिक वैद्य अनावश्यक औषधे, इंजेक्शन किंवा ‘सलाईन बॉटल’ यांचा वापर करण्यासाठी सांगत असल्याचे आपण सर्रासपणे पहातो’, असे लिखाण आहे. या लिखाणाला तंबाखू निर्मूलन संघटना आणि भारतीय वैद्यकीय संघटनेचा गोवा विभाग यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.
सरकार खर्या बातमीला विरोध करून स्वतः कुणाच्या बाजूचे हे सांगणार का ?
पाठ्यपुस्तकातील आक्षेपार्ह भाग विद्यालयांनी शिकवू नये ! – शिक्षण संचालक
‘सातवी इयत्तेतील समाजशास्त्र पुस्तकातील खासगी वैद्यकीय क्षेत्रातील अपप्रकाराविषयीचा वादग्रस्त भाग विद्यालयांनी शिकवू नये, अशा आशयाचा आदेश लवकरच प्रसिद्ध केला जाणार आहे’, असे आश्वासन शिक्षण संचालक मनोज सावईकर यांनी ‘भारतीय वैद्यकीय संघटने’च्या गोवा विभागाने विरोध केल्यानंतर दिले.’