पोहे आणि त्याचे गुणधर्म

घरोघरी आयुर्वेद

दही पोहे, दूध पोहे, दडपे पोहे, कांदा पोहे, इंदौरी, नागपूरचे तर्री पोहे आणि गोव्यात दिवाळीच्या वेळी पोह्याचे वेगवेगळे प्रकार असतात. पोहे आवडत नाहीत, अशी व्यक्ती विरळा. पोह्यांचे गुणधर्म पाहूया.

पृथुका गुरवो वातनाशनाः श्लेष्मला अपि ।
सक्षीरा बृंहणा वृष्या बल्या भिन्नमलाश्च ते ।।

​- भावप्रकाशनिघण्टु, वर्ग १२, श्लोक १७७

अर्थ : पोहे पचायला जड, वातनाशक, तसेच कफकारक असतात. दुधासह खाल्यास बळ देणारे, तसेच मलावरोध (मलावष्टंभ) करणारे असतात.

​पोहे विशेषतः दुधासह खाल्ल्यास बळ देणारे असतात. नियमित व्यायाम करणारे आणि भूक उत्तम असणार्‍या व्यक्तींनी खाणे श्रेयस्कर. आपण पदार्थांचे मूलभूत नियम लक्षात ठेवले की, वेगवेगळ्या पाककृतींचे गुणधर्मही सहज लक्षात येतील. पोहे खाल्ल्यावर कित्येकांना पित्ताचा त्रास होतो. याचे कारण बर्‍याचदा पोहे नसून त्यात घातलेले शेंगदाणे, मिरची वा सोबत घेतलेला चहा असतो.

– वैद्य परीक्षित शेवडे, आयुर्वेद वाचस्पती, डोंबिवली.