
पंढरपूर – येथे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दर्शन घेऊन राज्यात भरपूर पाऊस पडावा, अशी प्रार्थना केली आणि हवामान खात्याचे अंदाज चुकीचे ठरून बळीराजाला दिलासा मिळावा, असे साकडे त्यांनी श्री विठ्ठल चरणी घातले. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर येथे भाविकांची गर्दी वाढू लागली आहे, दर्शनासाठी येणार्या भाविकांच्या सोयीसाठी प्रशासन आणि मंदिर समितीकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.
या वेळी पत्रकारांशी बोलतांना दत्तात्रय भरणे यांनी राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे सांगितले. शेतकरी आणि नागरिक यांनी अफवांवर विश्वास ठेवून विनाकारण इंधनसाठा करू नये, आवश्यकतेनुसारच पेट्रोल-डिझेल खरेदी करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
तरुणीशी अनेक वर्षे शारीरिक संबंध ठेवून लग्नास नकार देणार्या तरुणावर गुन्हा नोंद
दोडामार्ग येथे सेवानिवृत्त वृद्ध व्यक्तीची २ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक
तुर्भे विभागात विद्युत् पुरवठा वारंवार खंडित; जनता त्रस्त !
स्थानांतरासाठी शिक्षकाकडून २५ सहस्र रुपयांची लाच घेतांना अधिकारी डी.सी. कुंभार यांना अटक
अक्कलकोट येथे शाळकरी मुलीवर अत्याचार करणार्या अरबाजला अटक !
बेडग (सांगली) येथे सिलिंडरचा स्फोट