ध्येयाप्रत कार्यरत रहाणे महत्त्वाचे !

घरोघर जाऊन ध्येयाचा प्रचार करा. त्याने तुमचे स्वतःचे भले तर होईलच; पण त्यासमवेतच तुम्ही आपल्या देशाचेही हित साधाल. देशाच्या सर्व भावी आशा तुमच्यावरच अवलंबून आहेत. तुमचे क्रियाशून्य जीवन बघून माझ्या हृदयाला अत्यंत तीव्र वेदना होत आहेत. कामाला लागा ! रेंगाळू नका, उगीच वेळ गमावू नका, दिवसेंदिवस मृत्यू तुमच्या अधिकाधिक निकट येत आहे. ‘वेळ आली की मग सर्वकाही करू’, असा विचार करून आळसात काळ घालवू नका.

(साभार : ‘स्वामी विवेकानंद म्हणतात’, रामकृष्ण मठ, नागपूर.)

 देश हिंदु राष्ट्र घोषित होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही !

श्री. सुनील घनवट

‘वर्ष १९४७ मध्ये देशाची फाळणी झाली. इस्लामी राष्ट्र म्हणून पाकिस्तानची निर्मिती झाली. मग उर्वरित राष्ट्र ‘हिंदु राष्ट्र’ म्हणून घोषित व्हायला हवे होते; मात्र तसे झाले नाही. वर्ष १९७६ मध्ये ४२ वी घटनादुरुस्ती करत देशाला ‘धर्मनिरपेक्ष राष्ट्र’ घोषित करण्यात आले. जगात १५७ ख्रिस्ती, ५२ मुसलमान, १२ बौद्ध आणि १ ज्यूंचे राष्ट्र आहे. भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी ८० टक्के हिंदू असतांना भारताला ‘हिंदु राष्ट्र’ म्हणून का घोषित केले जात नाही ? त्यामुळे हा देश हिंदु राष्ट्र म्हणून घोषित होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही.’

– श्री. सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती.