वाशिममध्ये चोरीच्या २ घटना; १७ लाख रुपयांचा माल चोरला !

कडेचोराला महिलांचा चोप !

घटनास्थळीचे छायाचित्र

वाशिम – जिल्ह्यात चोरीच्या २ घटना समोर आल्या. कारंजा येथील मेमन वसाहतीत सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक जमील शेख यांच्या घरातून चोरट्यांनी १७ लाख ३० सहस्र रुपयांचा माल चोरला. या वेळी कुटुंबीय झोपलेले होते. पोलिसांनी श्वान पथक आणि ‘सीसीटीव्ही’ यांच्या साहाय्याने अन्वेषण चालू केले आहे. मंगरुळपीर बसस्थानकावर चोरट्याने मुलाच्या हातातील कडे चोरण्याचा प्रयत्न केला. सतर्क महिलांनी त्याला पकडून चोप देत पोलिसांच्या कह्यात दिले.