महाकाय कॅसिनो नौका गोव्यात आणल्याचे प्रकरण

पणजी, ७ मे (वार्ता.) – ‘इनफ इज इनफ’ आंदोलनाने ‘डेल्टिन रॉयल कॅसिनो’ची महाकाय नौका गोव्यात आणल्याच्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात ‘कॅव्हिएट’ (हस्तक्षेप याचिका) प्रविष्ट (दाखल) केले आहे.
‘डेल्टिन रॉयल कॅसिनो’ची महाकाय नौका सध्या मुरगाव बंदरात नांगरलेली आहे आणि ही नौका वेरे बाजूने आणली जाऊ शकते, अशी भीती स्थानिकांमध्ये आहे. या पार्श्वभूमीवर ‘इनफ इज इनफ’ आंदोलन आणि ‘पणजीकर अगेन्स्ट कॅसिनो’ या संघटनांनी ‘कॅप्टन ऑफ पोर्ट्स’च्या महाकाय नौकेला गोव्यात संमती देण्याच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठात आव्हान दिले आहे आणि या प्रकरणी न्यायालयात कॅसिनो नौकेच्या जलप्रवासाला ६ मे या दिवशी अंतरिम निवाडा देतांना स्थगिती देण्यात आली आहे. ‘इनफ इज इनफ’ आंदोलन या संघटनेला यांना भीती आहे की, संबंधित कॅसिनो आस्थापन उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देऊ शकते आणि या पार्श्वभूमीवर सर्वाेच्च न्यायालयाने या प्रकरणी एकतर्फी निर्णय न देता ‘इनफ इज इनफ’ आंदोलनाचीही बाजू ऐकून घ्यावी, यासाठी सर्वोच्च न्यायालयात ‘कॅव्हिएट’ प्रविष्ट करण्यात आले आहे.
मांडवीत नवीन कॅसिनो येणार नाही ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
पणजी – मांडवी नदीमध्ये कोणतीही नवीन कॅसिनो नौका किंवा नवीन कॅसिनो यांना परवाना दिला जाणार नाही, असा पुनरुच्चार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ७ मे या दिवशी पणजी येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देतांना केला. या प्रकरणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यापूर्वीच म्हटले आहे की, राज्य सरकार गोव्यात कोणताही नवीन कॅसिनो आणत नाही. जुन्या नौकेच्या जागी मोठी नौका आणण्याचा संबंधित कॅसिनो आस्थापनाने दिलेला प्रस्ताव सरकारने तांत्रिक कारणास्तव यापूर्वी नाकारला आहे आणि कॅसिनो आस्थापनाला नौकेमध्ये सुधारणा करण्यास सांगितले आहे. राज्य सरकारने वर्ष २०२६ च्या अर्थसंकल्पात नवीन कॅसिनोच्या शुल्कात मोठी वाढ केली आहे. मांडवीत सध्या असलेल्या ६ तरंगत्या कॅसिनोंच्या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही नवीन कॅसिनोला या क्षेत्रात प्रवेश दिला जाणार नाही.
सांखळी येथील पुरातन किल्ल्याच्या नूतनीकरण प्रकल्पाचे लोकार्पण
मंगेशी येथे स्व. लता मंगेशकर आणि स्व. आशा भोसले यांचे स्मारक आणि संग्रहालय उभारणार ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे
दौंडमध्ये गुळात साखरेची भेसळ केलेला १७ लाखांचा साठा जप्त !
शेतकर्यास अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी साहाय्यक कृषी अधिकारी अमोल देवकर तात्काळ निलंबित !
राधानगरी परिसरात (जिल्हा कोल्हापूर) महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक अत्याचार : ४ जणांना अटक !
पुणे जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई !