मुंबईत वृक्षगणना चालू !

मुंबई – ८ वर्षांनी यंदा मुंबईतील झाडांची गणना करण्यात येत आहे. विकासकामांमुळे अनेक ठिकाणी झाडे कापली गेली आहेत. मुंबईतील झाडांची उंचीही विकासकामांमुळे न्यून झाली आहे. यातून वृक्षांची संख्या न्यून झाली कि पुनर्राेपणामुळे वाढली ? हे यामुळे समजणार आहे. हे सर्वेक्षण ड्रोनच्या साहाय्याने करण्यात येणार आहे. २ वर्षांनंतर या वृक्षगणनेचा अहवाल येईल.

पर्यावरणवाद्यांकडून झाडे तोडल्याचा तर प्राधिकरणाकडून झाडे लावल्याचा दावा केला जातो. ही संख्या कळल्यावर वृक्षांची संख्या वाढली कि न्यून झाली, ते कळणार आहे. निविदा मागवून हे काम चालू केले आहे.