आजपासून राज्यातील परिचारिकांचा बेमुदत संप !

पुणे – विविध मागण्यांसाठी राज्यातील परिचारिकांनी २१ एप्रिलपासून बेमुदत संप पुकारला आहे. ‘महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस असोसिएशन’ आणि पुण्यातील ससून रुग्णालयातील परिचारीकाही या संपात सहभागी होणार आहेत. (कोणत्याही मागण्यांसाठी संप करणे हे अयोग्यच आहे, त्यामुळे जनतेला मन:स्ताप होतो आणि राज्य-राष्ट्र यांची हानीही होते ! – संपादक) यामुळे रुग्णालयातील सेवांवर परिणाम होणार असून आरोग्यसेवा प्रभावित होण्याची शक्यता आहे.  जुन्या निवृत्तीवेतनाची कार्यवाही करावी, परिचारिकांची रिक्त पदे भरण्यात यावीत आणि सेवानिवृत्तीचे वय ५८ वर्षांवरून ६० वर्षे करावे अशा परिचारिकांच्या मागण्या आहेत.