नकार दिल्यावर नग्न व्हिडिओ पाठवण्यासाठी दबाव
नग्न व्हिडिओ पाठवल्यावर ब्लॅकमेल
पोलिसांनी कह्यात घेताच गुप्तांग कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न

बेंगळुरू – लव्ह जिहाद्याने कर्करोगग्रस्त असल्याचे सांगून हिंदु शिक्षिकेकडे शारीरिक संबंधांची मागणी केल्याची घटना घडली.
१. एका वर्षापूर्वी आंध्रप्रदेशातील पुट्टपर्ती येथील अर्शद याने बेंगळुरूतील पीडित शिक्षिकेला व्हॉट्सॲपवरून अनोळखी मेसेज पाठवला होता.‘मी तुझा जुना वर्गमित्र आहे’, अशी ओळख करून देत त्याने तिच्याशी मैत्रीपूर्ण गप्पा मारल्या. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून शिक्षिकेनेही त्याच्यासमवेत ‘चॅटिंग’ चालू ठेवले.
🚨 Shocking Case in Bengaluru
Arshad from Andhra befriended a Hindu teacher online, claimed he had cancer, and later said fulfilling his “last wish” meant physical relations.
After rejection, he pressured her for nude videos, then blackmailed her after receiving them.
Later,… pic.twitter.com/eJheg3cogJ
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 16, 2026
२. काही दिवसांनंतर अर्शद याने तो कर्करोगग्रस्त असल्याचे सांगून शिक्षिकेची सहानुभूती मिळवली. या बहाण्याने त्याने तिच्याकडून वारंवार आर्थिक साहाय्य घेण्यास आरंभ केला.
३. त्यानंतर ‘मला कर्करोग झाल्याने माझी शेवटची इच्छा पूर्ण कर’, असे सांगून त्याने शिक्षिकेकडे शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली. शिक्षिकेने यास नकार दिल्यावर त्याने ‘किमान न्यूड (नग्न) व्हिडिओ तरी पाठव’, असा तगादा लावला. यावर शिक्षिकेने स्वतःचा तसा व्हिडिओ त्याला पाठवला.
४. व्हिडिओ हाती येताच अर्शद याने रंग पालटले आणि त्या व्हिडिओचा वापर करून शिक्षिकेला ब्लॅकमेल करण्यास आरंभ केला. ‘पैसे न दिल्यास व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित करणार’, अशी धमकी देत त्याने पैसे आणि लैंगिक संबंध ठेवण्यासाठी दबाव आणायला आरंभ केला.
५. हा मानसिक त्रास सहन न झाल्याने शिक्षिकेने अन्य सहकार्यांना ही गोष्ट सांगितली. त्यानंतर त्यांच्या साहाय्याने आरोपीला जाळ्यात ओढण्याची योजना आखण्यात आली. ‘तू बेंगळुरूला आलास, तर तू म्हणशील तसे मी ऐकेन’, असा विश्वास निर्माण करून आरोपीला बेंगळुरूला बोलावण्यात आले.
६. अर्शद शिक्षिकेच्या घरी पोचल्यावर शिक्षिका आणि तिचे सहकारी यांनी त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. या वेळी अर्शद याने तक्रार न करण्याची विनंती केली; पण शिक्षिकेने तक्रार केली.
७. यामुळे घाबरलेल्या अर्शद याने बॅगेतून रेझर ब्लेड काढून स्वतःचा हात आणि गुप्तांग कापून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी तातडीने कारवाई करत त्याला रुग्णालयात भरती केले.
म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाईंग यांचे मुंबईत स्वागत !
अहिल्यानगरमध्ये धर्मांधांकडून हिंदु कुटुंबावर प्राणघातक आक्रमण !
Ramdas Athawale : (म्हणे) ‘हातभट्ट्या अधिकृत केल्यास सरकारला महसूल मिळेल !’
मुंबईत उबेरच्या चालकाकडून तरुणीशी गैरवर्तन
गोरेगाव येथे सरकारी भूमीवरील अवैध दर्गा भुईसपाट !
शासकीय कार्यालयांत ‘केवळ नामधारी’ ही मराठी भाषा अधिकार्यांची ओळख पुसण्यासाठी होणार प्रयत्न !