
वेंगुर्ला – तालुक्यातील दाभोली कोर्याचीवाडी येथील विवेक जोशी यांच्या स्वयंपाकघरात ८ एप्रिल या दिवशी सकाळी ९ वाजता बिबट्या येऊन बसला. हा प्रकार जोशी यांच्या लक्षात येताच त्यांनी घराचे दरवाजे बंद करून याची माहिती वन विभागाला दिली. त्यानंतर वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी येऊन बिबट्याला जेरबंद केले. जेरबंद केलेल्या बिबट्याला वैद्यकीय उपचारासाठी पशूवैद्यकीय चिकित्सालयात नेण्यात आले. त्याच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली की, त्याला वैद्यकीय अधिकार्यांच्या समादेशाने नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे. बिबट्या घायाळ आणि अशक्त झालेला असल्याने तो आश्रयासाठी घरात आल्याचे वन विभागाच्या पथकाने सागितले.
तरुणीशी अनेक वर्षे शारीरिक संबंध ठेवून लग्नास नकार देणार्या तरुणावर गुन्हा नोंद
दोडामार्ग येथे सेवानिवृत्त वृद्ध व्यक्तीची २ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक
सांखळी येथील पुरातन किल्ल्याच्या नूतनीकरण प्रकल्पाचे लोकार्पण
मंगेशी येथे स्व. लता मंगेशकर आणि स्व. आशा भोसले यांचे स्मारक आणि संग्रहालय उभारणार ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे
दौंडमध्ये गुळात साखरेची भेसळ केलेला १७ लाखांचा साठा जप्त !
संपादकीय : सरकारची ऑनलाईन फसवणूक !