
मुंबई – ठाणे ते बोरिवली दुहेरी भुयारी मार्ग प्रकल्पासाठीच्या ‘टनेल बोरिंग’ यंत्राचा शुभारंभ ७ एप्रिल या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, परिवहनमंत्री प्रताप सरनाईक उपस्थित होते. हा देशातील पहिला दुहेरी भुयारी प्रकल्प असून या मार्गाची लांबी ११.८४ किलोमीटर आहे.
यातील ५.७५ भाग बोरिवलीमध्ये, तर ६.९ किलोमीटर मार्ग ठाणे जिल्ह्यात आहे. यांतील प्रत्येक बोगद्यामध्ये २ मार्ग वाहतुकीसाठी, तर १ मार्ग आपत्कालीन मार्ग असेल. अशा प्रकारे येणारे आणि जाणारे अशा दोन्ही बोगद्यांमध्ये मिळून ६ मार्गिका असणार आहेत. ‘मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा’द्वारे (‘एम्.एम्.आर्.डी.’द्वारे) हे काम चालू असून या प्रकल्पासाठी १६ सहस्र ६०० कोटी रुपये इतका व्यय लागणार आहे. या मार्गामुळे बोरिवली ते ठाणे हा २ ते अडीच घंट्यांचा प्रवास १५ मिनिटांत होईल. या मार्गामुळे २३ किलोमीटरचे अंतर १२ किलोमीटर इतके होणार आहे. मे २०२८ पर्यंत या मार्गाचे काम पूर्ण होईल. या मार्गात भुयार निर्माण करण्यासाठी वापरण्यात येणारे टनेल १३.३४ मीटर व्यास इतके मोठे आहे. भविष्यात हा मार्ग नाशिक, कल्याण आणि नवी मुंबई यांकडे जाणार्या मार्गांनाही जोडला जाणार आहे. या भुयारी मार्गामुळे बोरिवली (पश्चिम), बोईसर, घोडबंदर येथील गर्दी न्यून होईल.
सांखळी येथील पुरातन किल्ल्याच्या नूतनीकरण प्रकल्पाचे लोकार्पण
मंगेशी येथे स्व. लता मंगेशकर आणि स्व. आशा भोसले यांचे स्मारक आणि संग्रहालय उभारणार ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे
दौंडमध्ये गुळात साखरेची भेसळ केलेला १७ लाखांचा साठा जप्त !
शेतकर्यास अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी साहाय्यक कृषी अधिकारी अमोल देवकर तात्काळ निलंबित !
राधानगरी परिसरात (जिल्हा कोल्हापूर) महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक अत्याचार : ४ जणांना अटक !
पुणे जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई !