The Kerala Story 2 : ‘द केरला स्टोरी २’ चित्रपटातील घटना प्रत्यक्षात घडतात ! – ‘बोध बाय शरण’ यूट्यूब वाहिनी

‘बोध बाय शरण’ यूट्यूब वाहिनीवर ‘लव्ह जिहाद’च्या पीडितांनी मांडली व्यथा

थिरुवनंतपूरम् (केरळ) – ‘द केरला स्टोरी २’ चित्रपटाची चर्चा चालू असतांनाच या चित्रपटात दाखवल्याप्रमाणे धर्मांतराच्या जाळ्यात अडकलेल्या केरळमधील अनेक पीडित मुलींनी ‘लव्ह जिहाद’विषयी बोलण्याचे धाडस दाखवले. ‘बोध बाय शरण’ या यूट्यूब वाहिनीवर पीडितांनी एका मुलाखतीत ‘लव्ह जिहाद’चे स्वरूप उघड केले.

मुलाखतीत सहभागी आधुनिक वैद्य असलेली तरुणी म्हणाली, ‘‘तिच्या मुसलमान मैत्रिणी हिंदु धर्माविषयी खोटी जिज्ञासा दाखवून हिंदु धर्मातील पद्धतींविषयी प्रश्न विचारत असत. हिंदु तरुणीला काही प्रश्नांची उत्तरे देता न आल्यावर मुसलमान मुलींनी तिचा बुद्धीभेद करत तिच्या हिंदु धर्माविषयी भ्रम निर्माण केला आणि तिला कुराणमधील केवळ चांगल्या गोष्टी सांगितल्या. तसेच तिचे हळूहळू मानसिकरित्या परिवर्तन केले. अंततः तिला इस्लामी चालीरिती पाळण्यास आणि नमाजपठण करण्यास उद्युक्त केले. ‘देवघरात वडील श्रीकृष्णाची पूजा करत असतांना मी वरच्या खोलीत नमाजपठण करत असे. नंतर हे आई-वडिलांना कळल्यावर त्यांचे न ऐकता त्यांच्यापासून दूर होण्याची धमकी मी त्यांना दिली.’’ अनेक हिंदु पीडिता त्यांच्यावर झालेले अत्याचार धाडसाने मांडत असल्याने ‘लव्ह जिहाद’चे खरे स्वरूप उघड होत आहे.

संपादकीय भूमिका 

हे पाहून तरी केंद्र सरकार देशपातळीवर कठोर लव्ह जिहादविरोधी कायदा करणार का ?