साधकांनो, मनात येणार्‍या अहंयुक्त विचारांमुळे साधनेत होणारी हानी लक्षात घेऊन ते घालवण्यासाठी अंतर्मुखतेने कठोर प्रयत्न करा !

उत्तरदायी साधकांनी प्रेमाने आणि सहजतेने बोलावे, या अपेक्षेची पूर्तता न झाल्याने साधकांवर मनाला नकारात्मकता येणे, पूर्वग्रह निर्माण होऊन मनाचा संघर्ष होणे, बहिर्मुखता वाढणे इत्यादी परिणाम होत असल्याचे लक्षात येते.

श्रीगुरूंना अपेक्षित असलेले रामराज्‍य अंतर्बाह्य अवतरावे, यासाठी साधनेचे प्रयत्न झोकून देऊन करण्‍याचा शुभसंकल्‍प करा !

‘यंदा २२ मार्च या दिवशी गुढीपाडवा आहे. गुढीपाडवा, म्‍हणजे सृष्‍टीचा निर्मितीदिन ! या नववर्षारंभ दिनाच्‍या निमित्ताने श्रीरामस्‍वरूप सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्‍या चरणी शरण जाऊन साधनेचे प्रयत्न वृद्धींगत करण्‍याचा शुभसंकल्‍प करूया !’

साधकांनो, नूतन शोभन संवत्‍सरात सनातनच्‍या गुरुपरंपरेप्रती ‘समर्पणभाव’ आणि ‘शरणागतभाव’ वाढवण्‍यासाठी प्रयत्न करा !

‘२२.३.२०२३ या दिवशी गुढीपाडवा आहे. गुढीपाडवा म्‍हणजे ब्रह्मांडनिर्मितीचा दिवस ! ऋषींनी ‘कल्‍प, मन्‍वंतर, युग, संवत्‍सर, ऋतू, मास, पक्ष, वार, तिथी, मुहूर्त, घटिका, विघटी, परमाणू’, अशी ब्रह्मांडाची कालगणना सांगितली आहे. गुढीपाडव्‍याला ‘शुभकृत्’ संवत्‍सर पूर्ण होऊन ‘शोभन’ संवत्‍सराला आरंभ होणार आहे.

साधकांनो, साधनेतील आनंदाची तुलना कोणत्‍याही बाह्य सुखाशी होऊ शकत नसल्‍याने साधनेचे प्रयत्न तळमळीने करा आणि खरा आनंद अनुभवा !

साधकांच्‍या मनात मायेतील विचारांची तीव्रता आणि वारंवारता अधिक असल्‍यास त्‍यांनी यासाठी स्‍वयंसूचना घ्‍याव्‍यात. अनिष्‍ट शक्‍तींच्‍या त्रासामुळे असे विचार वाढले असल्‍यास नामजपादी उपाय वाढवावेत.

देवद (पनवेल) येथील सनातनच्‍या आश्रमात झालेल्‍या सद़्‍गुरु राजेंद्र शिंदे यांच्‍या ‘उग्ररथ शांतीविधी’च्‍या वेळी त्‍यांना झालेला त्रास आणि आलेल्‍या अनुभूती !

९.१.२०२३ या दिवशी देवद (पनवेल) येथील सनातनच्‍या आश्रमात माझा ‘उग्ररथ शांतीविधी’ (टीप) झाला. ‘हा विधी आश्रमासारख्‍या पवित्र आणि सात्त्विक ठिकाणी होणार, म्‍हणजे त्‍याचे फळ अनेक पटींनी मिळणार’, हे निश्‍चितच होते.

अडचणींच्या वेळी प्रेमाने आधार देणार्‍या कृपावत्सल श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ !

मागील काही दिवसांपासून माझ्या मनात स्वतःच्या वैयक्तिक समस्यांविषयी पुष्कळ विचार येत होते. तेव्हा एकदा रात्री स्वप्नात मला श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचे दर्शन झाले.

सोलापूर येथील कु. सावित्री गुब्‍याड हिला रामनाथी येथील सनातनच्‍या आश्रमातील साधना शिबिराच्‍या वेळी आलेल्‍या अनुभूती !

श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ सभागृहात आल्‍यावर एक विशिष्‍ट प्रकारचा सुगंध येत होता आणि वातावरणात गारवा जाणवत होता.

श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्‍या संदर्भात साधिकेला आलेल्‍या अनुभूती आणि त्‍याबद्दल साधिकेने व्‍यक्‍त केलेली भावपूर्ण कृतज्ञता !

‘श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ सूक्ष्मातून समवेत आहेत’, असे जाणवणे

आधुनिक वैद्या (सौ.) अरुणा सिंह यांना त्यांच्या नूतन वास्तूत राक्षोघ्न याग करतांना आलेल्या अनुभूती

‘२३.११.२०२० या दिवशी आम्ही फोंडा येथील नूतन वास्तू ‘सार्थक आश्रम’ येथे राक्षोघ्न याग आयोजित केला होता. सनातनचे साधक पुरोहित श्री. दामोदर वझेगुरुजी, श्री. अंबरीष वझे आणि श्री. कौशल दामले यांनी यागाचे पौरोहित्य केले.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या सेवेच्या कक्षाचे नूतनीकरण करण्यापूर्वी आणि केल्यानंतर जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे

‘रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ ज्या कक्षामध्ये सेवा करतात, त्या कक्षाचे ऑक्टोबर २०२१ मध्ये नूतनीकरण करण्यात आले. हे नूतनीकरण करण्यापूर्वी आणि केल्यानंतर साधकाला जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे येथे देत आहोत.