मद्रास उच्च न्यायालयाने स्पष्ट केली अंधश्रद्धा आणि श्रद्धा यांतील सीमारेषा !

चेन्नई (तमिळनाडू) – एखादी व्यक्ती स्वतःच्या जागेत मूर्ती स्थापित करून स्वतःचे मित्र आणि शेजारी यांना बोलावून शांततेत पूजा करत असेल, तर त्यात सरकार हस्तक्षेप करू शकत नाही. सरकारी अधिकार्यांनी अंधश्रद्धा आणि खोट्या समजुती यांसमोर झुकू नये. देव किंवा मूर्ती मानवाला दुखापत करत नाहीत. अशा समजुती अंधश्रद्धा आहेत, त्यांना श्रद्धा मानता येत नाही, असा निर्णय मद्रास उच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला.
काय आहे प्रकरण ?
तमिळनाडूतील एनोर जिल्ह्यातील नेट्टुकुप्पम येथील भजन कोविल स्ट्रीट परिसरात रहाणारे कार्तिक यांनी त्यांच्या घरात शिवशक्ती श्री दक्षेश्वरी, श्री विनायक आणि श्री वीरभद्र स्वामी यांच्या मूर्तींची स्थापना करून ते नियमित त्यांची पूजा करत होते. परिसरातील काही लोकही त्या पूजेत सहभागी होत होते. मूर्तींची प्रतिष्ठापना आणि पूजा करण्यास प्रारंभ झाल्यानंतर परिसरातील काही जणांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. ‘मूर्तींची प्रतिष्ठापना आणि पूजा केल्यामुळेच लोकांचे मृत्यू होत आहेत’, अशी चर्चा परिसरात चालू झाली. स्थानिक रहिवाशांनी तक्रार केल्यानंतर अधिकार्यांनी मूर्ती जप्त केल्या. या कारवाईला विरोध करत मद्रास उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात आली. एप्रिल २०२५ मधील सुनावणीत न्यायालयाने मूर्ती पुन्हा याचिकाकर्त्यांकडे सोपवण्याचा आदेश दिला. तसेच ‘ध्वनीक्षेपकाचा लोकांना त्रास होईल, असा वापर होऊ नये आणि कुणाकडूनही देणगी गोळा करू नये’, असेही नमूद केले.
आदेश न पाळल्याचा आरोप
या आदेशानंतरही मूर्ती परत करण्यात आल्या नाहीत, असा आरोप करत कार्तिक यांनी न्यायालयाचा अवमान झाल्याची याचिका प्रविष्ट केली. (तमिळनाडूतील सत्ताधारी द्रमुक सरकारच्या कार्यकाळात तेथील प्रशासन आणि पोलीस न्यायालयाचा आदेशही पाळत नाहीत, हे लक्षात घ्या ! – संपादक) या याचिकेवर सुनावणी करतांना न्यायमूर्ती भरत चक्रवर्ती यांनी याचिकाकर्त्याला तिरुवोट्टियूर तालुका कार्यालयात जाऊन मूर्ती स्वतः घेऊन जाण्याचा निर्देश दिला. तसेच याचिकाकर्त्याच्या घरी अनुमतीविना मंदिर उभारले असल्यास, कायद्यानुसार पावले उचलण्याचे निर्देश अधिकार्यांना देण्यात आले. तसेच कुठे अर्पण पेटी ठेवली असल्यास त्यावरही कारवाई करण्यास सांगितले.
Bhopal University Renaming : बरकतउल्ला विद्यापिठाचे नाव ‘वाग्देवी भोजपाल विद्यापीठ’ होणार !
९० वर्षीय वृद्ध सासूला स्वतःच्या डोक्यावर वाहून नेत सूनबाई पूर्ण करत आहे ८४ कोस प्रदक्षिणा !
म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाईंग यांचे मुंबईत स्वागत !
Ramdas Athawale : (म्हणे) ‘हातभट्ट्या अधिकृत केल्यास सरकारला महसूल मिळेल !’
मुंबईत उबेरच्या चालकाकडून तरुणीशी गैरवर्तन
गोरेगाव येथे सरकारी भूमीवरील अवैध दर्गा भुईसपाट !