रांची (झारखंड) – राज्यातील झारखंड मुक्ती मोर्चाचे सरकार २५ ते ५० वयोगटातील गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना प्रतिमहा १ सहस्र रुपये देणार आहे. या योजनेचा ४० लाख महिलांना लाभ होणार आहे. योजनेवर वर्षाला ४ सहस्र कोटींहून अधिक रुपयांचा खर्च होऊ शकतो. ‘मुख्यमंत्री बहिण-मुलगी स्वावलंबन प्रोत्साहन योजना’ नावाची ही योजना १ जुलैपासून चालू करण्यात येणार आहे. सरकार लवकरच एक शिबिर आयोजित करून अर्ज घेणार आहे. जुलैमध्ये अर्जाची प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन आहे. या योजनेद्वारे महिलांच्या खात्यात पैसे पाठवणे ऑगस्टपासून प्रारंभ होऊ शकतो.