नवी देहली – केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने ‘यूजीसी-नेट’ (‘यूजीसी-नेट’ परीक्षा म्हणजे विद्यापीठ अनुदान आयोग – राष्ट्रीय पात्रता परीक्षा) परीक्षा रहित केली आहे. ही परीक्षा १८ जून या दिवशी घेण्यात आली होती. यात देशभरातील ३१७ शहरांतील १ सहस्र २०५ केंद्रांत ९ लाखांहून अधिक मुले-मुली सहभागी झाले होते. ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’कडून (राष्ट्रीय चाचणी यंत्रणेकडून) ही परीक्षा घेण्यात आली होती. आता ही परीक्षा पुन्हा घेण्यात येणार आहे. यूजीसी नेट परीक्षा जून आणि डिसेंबर महिन्यांमध्ये घेतली जाते.
शिक्षण मंत्रालयाने सांगितले की, या परीक्षेत अपप्रकार झाल्याचे संकेत मिळाले आहेत. परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी यूजीसी-नेट परीक्षा रहित करण्यात यावी, असे ठरवण्यात आले.