Delhi Court Orders To Vacate Mosques : देहलीतील बेकायदेशीर मशीद आणि मदरसा रिकामी करण्याचा देहली उच्च न्यायालयाचा आदेश

१ महिन्यानंतर दोघांनाही पाडण्यात येणार

नवी देहली – देहली उच्च न्यायालयाने देहलीतील सराय काले खान येथील हजरत निजामुद्दीन येथे असलेली बेकायदेशीर मशीद आणि मदरसा यांना १ महिन्यामध्ये रिकामी करण्याचा आदेश दिला आहे. हे दोन्ही पाडण्यात येणार आहेत. त्या सरकारी भूमीवर अतिक्रमण करून बांधण्यात आलेल्या आहेत. न्यायालयाने या दोघांना पाडण्याच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका या वेळी फेटाळून लावली. न्यायालयाने या वेळी याचिकाकर्त्याला स्पष्ट केले की, यापुढे या संदर्भात कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही; कारण ही भूमी सार्वजनिक कारणासाठी आवश्यक आहे.