Pune Christians Conversion Plot  Foiled : पुणे येथे धर्मप्रेमींच्या सतर्कतेमुळे ख्रिस्त्यांच्या धर्मांतराचा डाव उधळला !

  • ‘गीतेऐवजी बायबल वाचा’ असे म्हणत धर्मांतराची बळजोरी करणार्‍या ५ महिलांवर गुन्हा नोंद !

  • लहान मुलांचेही मतपरिवर्तन करून धर्मांतराचा प्रयत्न !

  • पोलिसांकडून तक्रार प्रविष्ट करून घेण्यास टाळाटाळ !

पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यासाठी आलेले धर्मप्रेमी

पुणे – ‘ख्रिस्ती धर्म स्वीकारला तर तुमचे आयुष्य चांगले जाईल. तुमच्या सर्व व्याधी दूर होतील. गीतेचे वाचन करण्यापेक्षा बायबलचे वाचन करा’, असे म्हणत घरात घुसून हातामध्ये बायबल ठेवत ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याची बळजोरी करण्यात आल्याची घटना चंदननगर येथे घडली. धर्मप्रेमी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यास गेल्यानंतर पोलिसांनी तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ केली. धर्मप्रेमींनी ठिय्या आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी ख्रिस्ती धर्मप्रचारकांच्या विरोधात गुन्हा नोंदवला  आहे. हा प्रकार १५ जून या दिवशी ‘विडी कामगार वसाहती’मध्ये घडला. या प्रकरणी प्रेरणा भंडारी यांनी तक्रार दिली आहे.

१. तक्रारीमध्ये म्हटले आहे की, तक्रारदार आणि त्यांच्या आईला ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याची बळजोरी केली, तसेच ‘आजकाल मुले मोठ्या प्रमाणावर भ्रमणभाष वापरत आहेत, त्याचे दुष्परिणाम त्यांच्या मनावर होत आहेत’, असे सांगून त्या महिलांनी लहान मुलांचेही मतपरिवर्तन करून धर्मांतराचा प्रयत्न केला आहे. ५ ख्रिस्ती धर्मप्रचारक अन्य ठिकाणी जाऊन त्यांनाही धर्मपरिवर्तन करण्याविषयी बळजोरी करत होत्या.

२. या प्रकरणी रिना मनसा, एलिसा आल्फ्रेड्, रिबेका सिगामनी, शारदा सोदे, प्रिया सिंगामनी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ‘तुमचे जीवन आनंदी करण्यासाठी आणि तुम्हाला असलेले भ्रमणभाषचे व्यसन सोडवण्यासाठी ‘मोबाईल कंपनी’कडून आलेलो आहे’, असेही त्या काही लोकांना सांगत होत्या. त्यांच्या पत्रकामध्ये ख्रिस्ती धर्माविषयी माहिती दिलेली असून त्यावरील ‘कोड स्कॅन’ केल्यास ‘ख्रिस्ती धर्माविषयी माहिती मिळेल’, असे सांगितले.

पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करतांना धर्मप्रेमी

पोलिसांची संवेदनशून्यता !

या प्रकारामुळे गोंधळ निर्माण झाल्याने काही वेळातच वस्तीमधील लोक जमा झाले. सर्व धर्मप्रेमी या ख्रिस्ती धर्मप्रचारकांना घेऊन चंदननगर पोलीस ठाण्यामध्ये गेले. या वेळी पोलीस प्रारंभी तक्रार प्रविष्ट करून घेत नव्हते. सकाळपासून ते दुपारी ३ पर्यंत सर्वांना ताटकळत ठेवले होते. त्यानंतर धर्मप्रेमींनी पोलीस ठाण्यासमोरील रस्त्यावर मध्येच बसून ‘रस्ता बंद’ करून ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर पोलिसांनी तक्रार प्रविष्ट करून घेतली. (पोलिसांच्या दृष्टीने हिंदूंचे धर्मांतर हा गंभीर विषय नाही का ? पोलिसांची संवेदनशून्यता कधी दूर होणार ? अशा पोलिसांची तक्रार खरेतर वरिष्ठ पोलिसांकडे करून त्यांचीही चौकशी करून त्यांच्यावर कारवाई होणे आवश्यक आहे ! – संपादक)

तक्रार प्रविष्ट केल्याविषयी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण म्हणाले, ‘‘धर्मपरिवर्तनाची बळजोरी केल्याबद्दल, तसेच धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आमचे पुढील अन्वेषण चालू आहे.’’ (तक्रार प्रविष्ट करण्यासाठी धर्मप्रेमींनी ठिय्या आंदोलन का करायला लावले ? – संपादक)

संपादकीय भूमिका

  • भारतात धर्मांतरविरोधी कायदा नसल्याने सहस्रोंच्या संख्येने हिंदूंचे धर्मांतर झाले आहे आणि होत आहे. धर्मांतरबंदीचा कायदा करण्यात आला नाही, तर पुढेही धर्मांतर होत राहील आणि एके दिवशी हिंदु अल्पसंख्य होतील !
  • हिंदूंच्या समस्यांकडे दुर्लक्ष करणारे पोलीस हिंदूबहुल भारतात असणे, हे लज्जास्पद ! अशा पोलिसांवर कठोर कारवाई आवश्यक !