Bakri Eid  Animal Slaughtering : बकरी ईदला मुंबईत होणार सहस्रावधी पशूंची हत्या !

११४ ठिकाणी पशूहत्येला अनुमती !

मुंबई –  बकरी ईदच्या निमित्ताने मुंबई महानगरपालिकेने आतापर्यंत शहरातील ११४ ठिकाणी पशूहत्येची अनुमती दिली आहे. या संख्येमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बकरी ईदच्या निमित्ताने मुंबईत सहस्रावधीच्या संख्येत पशूंची हत्या होण्याची शक्यता आहे.
बकरी ईदनिमित्त १७, १८ आणि १९ जून या तिन्ही दिवशी मुंबई शहरामध्ये पशूहत्येची अनुमती देण्यात आली आहे. पशूहत्येला अनुमती मिळावी, यासाठी अर्ज करण्याच्या दृष्टीने मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर स्वतंत्र अ‍ॅपही सिद्ध करण्यात आले आहे. पशूहत्या करतांना नियमांच्या अटी-शर्तीचे पालन करण्याचे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

संपादकीय भूमिका

  • हिंदु धर्मातच सण-उत्सवांत पशूंची पूजा होते, तर अन्य धर्मियांच्या सण-उत्सवांत पशूंची मोठ्या प्रमाणावर हत्या होते, हे लक्षात घ्या !
  • याविषयी प्राणीप्रेमी संघटना गप्प का ?