‘१९.१०.२०२३ या दिवशी श्री भैरवीदेवीचा यज्ञ झाला, तेव्हा दुर्गादेवीची आरती करत असतांना श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या चेहर्यावर लाल अन् पिवळा प्रकाश पडला होता. तो प्रकाश मला सहन होत नसल्यामुळे मी त्यांना नीट पाहू शकत नव्हते. मला ‘डोळे झाकावे’, असे वाटत होते; पण मला त्या दोघी अतिशय सुंदर दिसत होत्या. ते मी शब्दांत वर्णन करू शकत नाही. ‘तिथे साक्षात् दुर्गादेवीच प्रकटली आहे’, असे मला जाणवत होते. या प्रसंगातून ‘गुरुदेवांनी मला श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांचे खरे स्वरूप दाखवले’, असे मला जाणवले. ‘हे गुरुदेवा, आपल्या कृपेमुळे या कलियुगातही माझ्यासारख्या सामान्य जिवाला देवीचे खरे स्वरून पहाता आले’, यासाठी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे. कृतज्ञ आहे, गुरुदेवा, कृतज्ञ आहे.’
– सौ. सुजाता अशोक रेणके, फोंडा, गोवा. (२०.१०.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |