आज देवशयनी एकादशी

श्री विठ्ठल-रुक्मिणी

पांडुरंगकांती दिव्य तेज झळकती । रत्नकीळ फांकती प्रभा ।।
अगणित लावण्य तेजःपुंजाळले । न वर्णवे तेथींची शोभा ।।

ज्याची कांती दिव्य तेजाने झळकते आहे, अशा भक्तवत्सल श्री विठ्ठलाच्या चरणी शरणागतभावाने नमस्कार !

‘हे श्री विठ्ठला, भीषण आपत्काळातून तरून जाण्यासाठी आम्हा सर्वांना साधना करण्याची बुद्धी आणि शक्ती प्रदान कर. तसेच पृथ्वीवरील समस्त जिवांच्या कल्याणासाठी असलेल्या हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी वारकरी आणि सर्व हिंदुत्वनिष्ठ यांना आशीर्वाद दे’, अशी आषाढी एकादशीच्या निमित्ताने तुझ्या चरणी आर्ततेने प्रार्थना !’