मौलवीच्या नातेवाइकांमध्ये गेल्या काही मासांपासून मालमत्तेवरून चालू असलेल्या वादातून हत्या झाल्याचा संशय !
(मौलवी म्हणजे इस्लामचा धार्मिक नेता)
नवी देहली – ‘अल्-जजीरा अरेबिक’ या वृत्तवाहिनीने बिहारमध्ये हिंदूंनी सफी अहमद नावाच्या एका ८५ वर्षीय मौलवीचा शिरच्छेद करून हत्या केल्याची धादांत खोटी बातमी प्रसारित केली आहे. ‘राज्यातील सीवान जिल्ह्यात असलेल्या खालिसपूर गावातील एका मशिदीत ९ जूनच्या रात्री जेव्हा मौलवी झोपले होते, तेव्हा हिंदूंनी त्यांची हत्या केली’, असे या वृत्तात म्हटले आहे. अल्-जजीराने हे वृत्त ट्विटरवर ट्वीट करतांना ‘जस्टिस फॉर इमाम सीवान’ आणि ‘जस्टिस फॉर सीवान मौलवी’ (सिवान येथील मौलवीला न्याय मिळावा !) अशा प्रकारे हॅशटॅगचा (चर्चिला जाणारा विषय) वापरही केला आहे.
Al Jazeera spreads fake news over Maulvi’s death in Bihar, blames Hindus while local reports suggest family’s property disputehttps://t.co/66eSvtVz0S
— OpIndia.com (@OpIndia_com) June 20, 2022
दैनिक ‘जागरण’मध्ये प्रकाशित वृत्तानुसार मौलवी सफी अहमद यांच्या नातेवाइकांमध्ये मालमत्तेवरून अनेक मासांपासून वाद चालू होता. अहमद स्वत:च्या घरावर दावा करण्यासाठी सर्व अधिकृत कागदपत्रे घेऊन पोलिसांकडे तक्रार करण्यासाठी जाणार होते; परंतु आदल्या रात्रीच ते मशिदीत झोपलेले असतांना अज्ञात आक्रमणकर्त्यांनी त्यांची हत्या केली. मौलवीचा मुलगा अशफाक याने दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या नातेवाइकांनी काही दिवसांपूर्वी सफी अहमद आणि अशफाक दोघांना जिवे मारण्याची धमकीही दिली होती.
संपादकीय भूमिका
|