गुरुग्राम (हरियाणा) येथे सैफ अंसारीने हिंदु युवतीवर बलात्कार करून धर्मांतराचा दबाव आणला !

  • अंसारीचे वडील आणि मित्र यांनीही केला बलात्कार !

  • ८ मास अपहरण करून बंधक बनवून ठेवले !

प्रतिकात्मक छायाचित्र

नवी देहली – सैफ अंसारी नावाच्या युवकाने एका हिंदु युवतीला फसवून तिच्यावर बलात्कार केला. अंसारी याने त्याच्या नातेवाइकांकरवीही युवतीवर बलात्कार करायला लावला. बळजोरीने तिचे धर्मांतर करणे आणि गोमांस खायला लावणे असे गंभीर आरोपही त्याच्यावर आहेत.

पोलिसात केलेल्या तक्रारीनुसार सदर हिंदु पीडिता ही गुरुग्राममध्ये नोकरी करत होती. आरोपी सैफ अंसारी याने तिच्याशी मैत्री केली आणि एक दिवस तिला फसवून तिचे अपहरण केले. अन्नाकरवी तिला बेशुद्ध पडण्याचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला. त्याचे चित्रीकरण दाखवून तिला धमकावले. त्यानंतर तो तिला बिहारच्या रोहतास जिल्ह्यातील त्याच्या मूळ गावी घेऊन गेला. गावी त्याचे वडील आणि अन्य मित्र यांनी तिच्यावर ४ दिवस बलात्कार केला. त्यानंतर अंसारीने तिला गुरुग्रामला त्याच्या आत्याकडे आणले. तेथे तिला गोमांस खायला लावून तिच्यावर चाकूच्या धाकावर इस्लाम स्वीकारण्याचा दबाव आणला. अंसारीच्या आत्याने तिला बळजोरीने गोमांस खायला लावले. साधारण ८ मासांनी ती पळून पोलिसांकडे आली आणि तिने तक्रार नोंदवली. पोलिसांनी सैफ अंसारी, वडील शाहिद अंसारी, आत्या आणि ६ मित्र यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास चालू आहे.

संपादकीय भूमिका

  • हिंदु युवतींनो, धर्मांधांपासून सावध रहा ! स्वरक्षणार्थ स्वसंरक्षण प्रशिक्षण घेऊन सक्षम बना आणि आध्यात्मिक पाठबळ मिळण्यासाठी साधना करा !
  • धर्मांधांच्या वाढत्या उद्दामपणाला आळा घालण्यासाठी त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायला हवी !