हिंदु युवतींनी ‘लव्ह जिहाद’सारख्या षड्यंत्रांना बळी पडू नये ! – सौ. भक्ती डाफळे, हिंदु जनजागृती समिती

प्रतिकात्मक छायाचित्र

सातारा – ‘लव्ह जिहाद’ हे धर्मांधांनी रचलेले एक जागतिक षड्यंत्र आहे. या माध्यमातून हिंदु युवतींना फसवून त्यांना खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवणे, त्यांचे बळजोरीने धर्मांतर करणे, पुढे त्यांच्याकडून वासनापूर्ती करवून घेणे आणि त्यांना वेश्या व्यवसायामध्ये ढकलून देणे, अशी दुष्कृत्ये धर्मांधांकडून चालू आहेत. त्यामुळे हिंदु युवतींनी वेळीच जागृत होऊन ‘लव्ह जिहाद’सारख्या षड्यंत्रांना बळी पडू नये, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या सौ. भक्ती डाफळे यांनी केले. सातारा जिल्ह्यातील युवतींसाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘ऑनलाईन’ व्याख्यानात त्या बोलत होत्या. व्याख्यानाचा प्रारंभ भगवान श्रीकृष्णाच्या श्लोकाने झाला. या व्याख्यानाच्या आयोजनासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी सर्वश्री प्रवीण भोसले आणि अनिकेत नलवडे यांनी परिश्रम घेतले. या व्याख्यानाचा लाभ अनेक युवतींनी घेतला.

सौ. भक्ती डाफळे

सौ. भक्ती डाफळे पुढे म्हणाल्या की,

१. हिंदु युवतींना हिंदु मुलाचे नाव धारण करून फसवले जाते. खरे प्रेम असेल, तर धर्मांध युवक नाव का पालटतो ? लग्न झाल्यानंतर मुलीवर धर्मांतरासाठी बळजोरी का केली जाते ? या सर्व गोष्टींवरून लक्षात येते की, हे षड्यंत्रच आहे.

२. काही ठिकाणी ब्राह्मण, गुजराती, पंजाबी अशा विविध जाती-धर्माच्या मुलींना ‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यात ओढण्यासाठी धर्मांधांना पैसे मिळतात.

३. शाळा-महाविद्यालयांपासून या गोष्टींना प्रारंभ होतो. तेव्हा हिंदु युवतींनी आपल्या आसपास घडणार्‍या अनेक घटनांचा बारकाईने अभ्यास केला पाहिजे आणि जागृत राहिले पाहिजे.

४. तसेच हिंदु धर्मामध्ये धर्माचरणाच्या अनेक कृती सांगितल्या आहेत; मात्र त्याविषयी आपल्याला ठाऊक नसल्याने आपण त्या टाळतो. त्यामुळे युवतींनी धर्मशिक्षण घेऊन धर्माचरणाला प्रारंभ करणे आवश्यक आहे.

५. दैनंदिन उपासनेमुळे आपले मनोबलही वाढण्यास साहाय्य होते. त्यामुळे युवतींनी प्रतिदिन आपल्या उपास्यदेवतेचा नामजपही केला पाहिजे.

क्षणचित्रे

१. व्याख्यानानंतर काही युवतींनी धर्मशिक्षणवर्ग, तर काहींनी ‘ऑनलाईन’ स्वरक्षण प्रशिक्षणवर्ग चालू करण्याची मागणी केली.

२. काही युवतींनी ‘लव्ह जिहाद’ या ग्रंथाची मागणी केली.