अग्निहोत्र नियमित केल्यामुळे तुळशीला मुंग्या लागणे बंद होणे आणि तुळशीची अनेक रोपे उगवणे

१. मागील वर्षी नवीन लावलेल्या तुळशीच्या रोपांना लागलेल्या मंजिरी मुंग्यांनी खाऊन टाकणे आणि या वर्षी तुळशीची रोपे पुष्कळ प्रमाणात आपोआप उगवणे

‘आम्ही वर्ष २०१९ मध्ये घराच्या अंगणात तुळशीची ३ – ४ रोपे लावली होती. त्या तुळशीच्या रोपांना पुष्कळ मुंग्या येत होत्या. त्यामुळे आम्हाला पूजेसाठी तुळशी मिळणे कठीण झाले होते. तुळशीच्या रोपांना मंजिरी आल्या की, मुंग्या त्या खाऊन टाकत होत्या. आश्चर्य म्हणजे या वर्षी घरासमोर लांबपर्यंत पुष्कळ प्रमाणात तुळशीची रोपे उगवली आहेत. जसे पावसाळ्यात दाट गवत उगवते, तशी तुळशीची रोपे दाट आणि पुष्कळ प्रमाणात उगवली आहेत.

२. ‘नियमितपणे अग्निहोत्र केल्याने वातावरण सात्त्विक होऊन तुळशीची रोपे उगवली आहेत’, असे वाटणे आणि अग्निहोत्राला आरंभ केल्यापासून तुळशीच्या रोपांना मुंग्या येणे बंद होणे

आम्ही घरी ६ मासांपासून नियमितपणे अग्निहोत्र करत आहोत. ‘त्याच्या धुरामुळे वातावरणात सात्त्विकता निर्माण झाली आहे’, असे मला वाटते. त्यामुळे अंगणात सगळीकडे तुळशीची रोपे उगवली आहेत. ‘परमात्मा श्रीकृष्ण संतुष्ट झाला असेल’, असे मला वाटते. अग्निहोत्र करायला लागल्यापासून तुळशीच्या रोपांना मुंग्या येणे बंद झाले आहे.’

– श्री. सुब्रह्मण्य प्रसाद भट, कांचना, ता. पुत्तूरु, दक्षिण कन्नड. (१३.७.२०२०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक