परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७८ व्या जन्मोत्सवाच्या कार्यक्रमात नागपूर येथील सौ. रीभा मिश्रा यांना आलेली अनुभूती

अनुभूतींच्या माध्यमातून साधकांना आनंद देणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉ. आठवले

१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या दिवशी लहान मुलाला अकस्मात् उलट्या होणे आणि गुरुदेवांना प्रार्थना करणे

‘जन्मोत्सवाच्या दिवशी मी सकाळपासून पुष्कळ आनंदित होते. ‘आज परात्पर गुरु डॉ. आठवले सूक्ष्मातून येणार आहेत’, असे मला वाटत होते. माझा ४ वर्षांचा मुलगा चांगल्या स्थितीत होता; मात्र सकाळी ९ वाजल्यापासून अकस्मात् त्याला उलट्या चालू झाल्या. मी त्याच्या उलट्या स्वच्छ करून हैराण झाले होते. मी परात्पर गुरु डॉक्टरांना शरण जाऊन प्रार्थना केली, ‘हे गुरुदेवा माझ्या आनंदात कुणी विष घातले ? मी काय करू ? या आपत्काळात मुलाला रुग्णालयात घेऊन जायलाही मला भय वाटत आहे.’

२. ‘परात्पर गुरुदेवांनी मुलाच्या डोक्यावर हात ठेवला आहे’, असा भाव ठेवल्यावर मुलाचा त्रास दूर होणे

दुपारी २ वाजता परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाचा कार्यक्रम चालू झाला. तेव्हा मी परात्पर गुरुदेवांना प्रार्थना केली, ‘हे गुरुदेवा आपणच यावे.’ अश्‍वत्थाम्याने ब्रह्मास्त्र सोडल्याने अभिमन्यूची पत्नी उत्तरेचा बाळ गर्भातच मृत झाल्यावर भगवान श्रीकृष्णाने त्याच्यावर हात ठेवून त्याला जीवन दिले.
त्याप्रमाणे ‘परात्पर गुरुदेवांनी माझ्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवला आहे’, असा भाव मी ठेवला. तेव्हा त्यांनी हात ठेवताच माझ्या मुलाचे सर्व त्रास दूर झाले आणि तो झोपी गेला. थोड्या वेळानंतर तो उठला आणि अगदी चांगला झाला. त्याला पाहून असे वाटतच नव्हते की, याने सकाळपासून ७ वेळा उलट्या केल्या आहेत आणि तो रुग्णाईत होता. परात्पर गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केल्यावर पुष्कळ भावजागृती झाली. कृतज्ञता गुरुदेव !’

– सौ. रीभा मिश्रा, नागपूर

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक