‘परात्पर गुरु डॉक्टर प्रत्येक क्षणी साधकांचे कसे रक्षण करतात’, या संदर्भात रामनाथी आश्रमातील डॉ. अजय जोशी यांना आलेली अनुभूती

डॉ. अजय जोशी

१. गाडी चालवत असतांना एक भ्रमणभाष येणे, रामनाथी आश्रमाच्या फाटकापाशी पोचल्यावर भ्रमणभाष करण्यासाठी डोक्यावरील ‘हेल्मेट’ काढल्यावर झाडाचा करकर असा आवाज येणे

‘१४.४.२०२१ या दिवशी आम्ही (मी आणि सौ. नमिता पात्रीकर) सकाळी ७.५० वाजता ढवळी येथून दुचाकी गाडीने रामनाथी आश्रमात जायला निघालो. मी गाडी चालवत असतांना मला एक भ्रमणभाष आला. तेव्हा मी विचार केला, ‘आश्रमात गेल्यानंतर संबंधित व्यक्तीला भ्रमणभाष करूया.’ आम्ही रामनाथी आश्रमाच्या फाटकापाशी पोचल्यावर सौ. नमिता आश्रमात गेली आणि मी फाटकाजवळ उभा राहून भ्रमणभाष करण्यासाठी डोक्यावरचे ‘हेल्मेट’ काढले. तितक्यात मला डाव्या हाताच्या मागील बाजूला असलेल्या झाडाचा करकर असा (झाड पडत असल्याप्रमाणे) आवाज आला. मी तिथे जवळच उभा असल्याने ‘झाड पडले, तर विजेच्या तारा तुटल्यामुळे मला खूप धोकादायक ठरेल’, असे मला वाटले.

२. दुचाकी गाडी काढतांना गाडी आणि साधक पडणे, त्या क्षणी झाडाची फांदी तुटून जवळ येऊन पडणे अन् ‘इलेक्ट्रिक पोल’जवळ उभे असलेले श्री. धोतमल धावत आल्याने कुणालाही दुखापत न होणे

मी लगेच तेथे लावलेली माझी गाडी काढायला लागलो; पण मी पडलो आणि दुचाकी गाडीही पडली. त्या क्षणी झाडाची फांदी तुटून माझ्याजवळ काही अंतरावर येऊन पडली. झाडामुळे ‘इलेक्ट्रिक पोल’ आणि विजेच्या ताराही पडल्या. जेथे ‘इलेक्ट्रिक पोल’ पडला, तेथे श्री. धोतमल हे साधक उभे होते. ते माझ्या दिशेने पळत आले. त्यामुळे ते वाचले. आम्हाला दोघांनाही (मी आणि श्री. धोतमल यांना) काहीच झाले नाही.

मी दुचाकी गाडी चालवत असतांना मध्येच थांबून जर भ्रमणभाष घेतला असता, तर आम्ही रामनाथी आश्रमाच्या फाटकापाशी उशिरा पोचलो असतो आणि कदाचित् सौ. नमितावर हा प्रसंग ओढवला असता. अशा प्रकारे देवाने आमच्या तिघांचेही रक्षण केले.

‘आपले परात्पर गुरु डॉक्टर साधकांचे कसे रक्षण करतात’, हे या प्रसंगातून लक्षात येते. यातच आपल्या गुरूंची महानता दडली आहे.’

– प्राण्यांचे आधुनिक वैद्य अजय जोशी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.४.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक