मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे एम्.एस्. रेड्डी निलंबित

दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येचे प्रकरण

अमरावती – दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येच्या प्रकरणी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे एम.एस. रेड्डी यांचे निलंबन करण्यात आले. ते मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे अपर मुख्य प्रधान मुख्य वनसंरक्षक आहेत. दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर रेड्डी यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात येत होती. या प्रकरणातील प्रमुख आरोपी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांना २६ मार्चला अटक करण्यात आली होती. त्यानंतर रेड्डी यांच्यावर कारवाई होण्यासाठी अमरावती येथे आंदोलन करण्यात आले.