पुणे, ३० मार्च – कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे पुण्यात २८ मार्चच्या रात्री ८ पासून प्रतिदिन पुढील आदेश येईपर्यंत संचारबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. रात्री विनाकारण फिरणार्या नागरिकांवर कडक कारवाई करण्याचे आदेश सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिला आहे. तसेच महत्त्वाच्या कारणासाठी बाहेर पडणार्या नागरिकांची अडवणूक करण्यात येऊ नये, असेही आदेश त्यांनी सर्व पोलीस ठाण्यांना दिले आहेत.
डॉ. रवींद्र शिसवे यांनी सांगितले की, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, तसेच प्रवाशांनी तिकिटे, ओळखपत्रे जवळ बाळगावीत, तसेच पुणेकरांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.