‘ई-बसगाड्यां’साठी चार्जिंग स्थानकाचे जाळे उभारा ! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘विकसित महाराष्ट्र’च्या अंतर्गत एस्.टी.चा १०० टक्के ताफा ई-बसगाड्यांमध्ये रूपांतरित करण्याचे उद्दिष्ट

मुंबई – ‘विकसित महाराष्ट्र अंतर्गत’ राज्य परिवहन महामंडळात वर्ष २०२९ पर्यंत ५० टक्के, २०३५ पर्यंत ८० टक्के, तर २०४७ पर्यंत एस्.टी.चा १०० टक्के ताफा ई-बसगाड्यांमध्ये रूपांतरित करायचा आहे. या अनुषंगाने बसगाड्यांसाठी आवश्यक असलेले चार्जिंग स्थानक उभारण्याच्या कामाला गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. त्यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा येथील निवासस्थानी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ई-बसगाड्यांच्या संदर्भात बैठक झाली. त्या वेळी ते बोलत होते.