बकर्‍याचा ‘व्हर्च्युअल’ (आभासी) बळी देऊन बकरी ईद साजरी करण्याचा सल्ला द्या !

  • मंत्री नितेश राणे यांचे तथाकथित पर्यावरणवाद्यांना जाहीर आव्हान

  • ‘हिंदूंना मुसलमानांपासून नाही, तर स्वतःच्याच लोकांपासून धोका !’ या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांची करून दिली आठवण !

मंत्री नितेश राणे

नेरळ (जिल्हा रायगड) – हिंदु सणांच्या वेळी, उदा. होळीच्या सणात पर्यावरणाचे रक्षण करून होळी साजरी करावी, कोरडी होळी साजरी करावी, दिवाळीत फटाके फोडू नयेत, असे सल्ले तथाकथित पर्यावरणवाद्यांकडून दिले जातात. जे हिंदूंना ज्ञान शिकवतात, त्यांनी आता मुसलमानांना संगणकावर बकर्‍याचे छायाचित्र ठेवून त्याचा ‘व्हर्च्युअली’ बळी देऊन बकरी ईद साजरी करण्याचा सल्ला द्यावा, असे उघड आव्हान भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी दिले आहे. नेरळ येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. मंत्री नितेश राणे यांनी या वेळी हिंदूंच्या सणांवर होणार्‍या दुटप्पी टीकेवर प्रहार केला.

या वेळी त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विधानाचे स्मरण करून देत हिंदूंमधील फितुरीवरही बोट ठेवले. ते म्हणाले,  ‘‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी म्हटले होते की, हिंदूंना मुसलमानांपासून नाही, तर खुद्द हिंदूंपासूनच अधिक धोका आहे. आपलेच काही लोक निरुपयोगी आहेत.’’

तथाकथित पर्यावरणवाद्यांमध्ये धाडस आहे का ? – नितेश राणे

मंत्री नितेश राणे पुढे म्हणाले, ‘‘या पर्यावरणवाद्यांमध्ये मुसलमानांना ‘व्हर्च्युअल’ बळी देण्याचा सल्ला देण्याचे धाडस आहे का ? त्यांनी एकदा असा सल्ला देऊन बघावा, मग ते कुठे फिरतांना दिसतात ते संपूर्ण देश बघेल.’’

 ‘हिंदूऐक्य’ हीच काळाची आवश्यकता !

एका वेगळ्या पोस्टमध्ये मंत्री नितेश राणे यांनी लिहिले, ‘नेरळसारख्या ठिकाणी हिंदूऐक्य सशक्त करण्यासाठी हिंदु समाजाने एकत्र येणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हिंदु म्हणून आपण सर्वांनी ऐक्य दाखवले पाहिजे. सरकार म्हणून आपण सामाजिक सुरक्षा आणि न्याय सुनिश्चित करण्यासाठी कटीबद्ध आहोत’, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आजच्या काळात हिंदु समाजाने जागरूक, एकजूट आणि सतर्क रहाणे ही काळाची आवश्यकता आहे, त्याचसमवेत त्यांनी तेथे उपस्थित असलेल्या लोकांना आवाहन केले की, जर हिंदूंवर अन्याय किंवा अत्याचार झाले, तर संपूर्ण समाजाने एकजूट होऊन खंबीरपणे उभे रहावे.