
मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीसाठी देशवासियांना केलेल्या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक ठिकाणी ‘नो व्हेईकल डे’ (वाहनमुक्त दिवस) पाळण्यास प्रारंभ झाला आहे.
१. राज्यमंत्री, तसेच परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी परभणीच्या जनतेला १७ मे या दिवशी वाहनमुक्त दिवस पाळण्याचे आवाहन केले आहे. ‘अती आवश्यकता असल्यासच दुचाकी किंवा चारचाकी वाहनांचा वापर करावा’, असे त्यांनी सांगितले.
२. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिल्पा खोत यांनी कागल तालुक्यातील सेनापती कापशी या गावापासून ६० किलोमीटरचा प्रवास राज्य परिवहन महामंडळाच्या बसने केला. दसरा चौकातून त्या रिक्शाने जिल्हा परिषदेपर्यंत आल्या. कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये प्रत्येक शुक्रवारी वाहनमुक्त दिवस पाळण्याचे ठरवण्यात आले आहे.
३. नागपूर जिल्हा परिषदेचे कर्मचारी प्रत्येक सोमवारी सार्वजनिक वाहनाने प्रवास करणार आहेत. १८ मेपासून या उपक्रमास प्रारंभ होईल. नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी हे सोमवार, १८ मे या दिवशी कार्यालयापर्यंत चालत जातील.
सांखळी येथील पुरातन किल्ल्याच्या नूतनीकरण प्रकल्पाचे लोकार्पण
मंगेशी येथे स्व. लता मंगेशकर आणि स्व. आशा भोसले यांचे स्मारक आणि संग्रहालय उभारणार ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे
दौंडमध्ये गुळात साखरेची भेसळ केलेला १७ लाखांचा साठा जप्त !
शेतकर्यास अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी साहाय्यक कृषी अधिकारी अमोल देवकर तात्काळ निलंबित !
राधानगरी परिसरात (जिल्हा कोल्हापूर) महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक अत्याचार : ४ जणांना अटक !
पुणे जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई !