‘महाराष्ट्रातील देवस्थानाच्या इनामी भूमी निर्मूलना’च्या कायद्याचा मसुदा सिद्ध !

  • महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियम, २०२६’ चा मसूदा

  • ५ जूनपर्यंत मागवल्या सूचना आणि हरकती !

मुंबई, ६ मे (वार्ता.) – राज्यातील देवस्थानाच्या इनामी भूमीचे निर्मूलन करण्यासाठी ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियम, २०२६’ या अधिनियमाचा मसुदा महसूल विभागाच्या संकेतस्थळावर ‘अपलोड’ करण्यात (ठेवण्यात) आला आहे. देवस्थानच्या इनामी असलेल्या भूमी वर्षानुवर्षे वहिवाटदार, मिरासदार किंवा अन्य व्यक्ती यांना कसण्यासाठी दिलेल्या आहेत. आता त्यांची विक्री करता येणार असून त्या भूमीवरील महसूल सरकारला द्यावा लागणार आहे.

‘महाराष्ट्रातील देवस्थानाच्या इनामी भूमी निर्मूलना’च्या कायद्याचा मसुदा –

‘वक्फ अधिनियम’ आणि ‘हैदराबाद अतियात चौकशी अधिनियम’ यांना मात्र या अधिनियमातून वगळण्यात आले आहे. या अधिनियमाविषयीच्या सूचना आणि हरकती ५ जूनपर्यंत विभागीय आयुक्तांकडे द्यावयाच्या आहेत. त्यानंतर आलेल्या सूचना आणि हरकती ग्राह्य धरण्यात येणार नाहीत.