म्हापसा परिसरात चोरांचा सुळसुळाट

म्हापसा, ६ मे (वार्ता.) – मरड, म्हापसा येथील कॉसमॉस सेंटर या इमारतीमध्ये अज्ञात चोरट्यांनी ३ कार्यालये फोडून या कार्यालयांतील १५ सहस्र रुपयांची रोख रक्कम आणि इतर मौल्यवान वस्तू चोरून नेल्या. ही चोरीची घटना ६ मे २०२६ या दिवशी उघडकीस आली आणि त्यानंतर म्हापसा पोलिसांना याविषयी कळवण्यात आले.
यासंबंधी मिळालेल्या माहितीनुसार कॉसमॉस सेंटर इमारतीतील विकेश हसोटीकर आणि प्रवीण शेट यांच्या मालकीच्या कार्यालयांमध्ये ही चोरी झाली. यामध्ये विकेश हसोटीकर यांची २ कार्यालये आणि प्रवीण शेट यांचे १ कार्यालय यांचा समावेश आहे. चोरांनी दरवाजांचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि हसोटीकर यांच्या कार्यालयातील १५ सहस्र रुपये आणि तिन्ही कार्यालयातील काही मौल्यवान वस्तू चोरून नेल्या. सकाळी कार्यालय उघडल्यानंतर चोरी झाल्याचे उघडकीस आले. चोरांनी कार्यालयातील सामान विस्कटवून टाकले होते. या प्रकरणी म्हापसा पोलीस अन्वेषण करत आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून बार्देश तालुक्यात चोर्यांचे प्रमाण वाढले असून चोरांनी म्हापसा, पर्वरी, थिवी या भागांतील बंद घरांना लक्ष्य केले होते. पेडे म्हापसा, पर्वरी, थिवी येथे घरफोडीच्या मोठ्या घटना उघडकीस आल्या होत्या.
तरुणीशी अनेक वर्षे शारीरिक संबंध ठेवून लग्नास नकार देणार्या तरुणावर गुन्हा नोंद
दोडामार्ग येथे सेवानिवृत्त वृद्ध व्यक्तीची २ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक
सांखळी येथील पुरातन किल्ल्याच्या नूतनीकरण प्रकल्पाचे लोकार्पण
मंगेशी येथे स्व. लता मंगेशकर आणि स्व. आशा भोसले यांचे स्मारक आणि संग्रहालय उभारणार ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये अवैध मद्यविक्री करणार्यांवर २३ गुन्हे नोंद !
तुर्भे विभागात विद्युत् पुरवठा वारंवार खंडित; जनता त्रस्त !