चौकशीत कृपानिधी महाविद्यालयातील अपप्रकार उघड !
कृपानिधी महाविद्यालयात यापुढे कोणतीही सरकारी परीक्षा न घेण्याची जिल्हाधिकार्यांची सरकारला शिफारस

बेंगळुरू (कर्नाटक) – शहरातील ‘सामाईक प्रवेश परीक्षा’ अर्थात् ‘सीईटी’च्या (‘कॉमन एन्ट्रन्स टेस्ट’च्या) परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांचे जानवे काढायला लावल्याच्या प्रकरणी जिल्हाधिकारी के.ए. जगदीश यांनी सरकारला अहवाल सादर केला आहे. यात कृपानिधी महाविद्यालयातील अपप्रकार उघडकीस आला आहे. सीईटी परीक्षेत विद्यार्थ्यांचे जानवे हेतूपुरस्सर काढायला लावले गेले, असे चौकशीत निष्पन्न झाले आहे. या पार्श्वभूमीवर कृपानिधी महाविद्यलयाला यापुढे परीक्षा केंद्रांच्या सूचीतून वगळण्याची शिफारस या अहवालात करण्यात आली आहे. ‘पुढील वर्षापासून या महाविद्यालयामध्ये सीईटीसह कोणत्याही प्रकारच्या सरकारी परीक्षा घेऊ नयेत’, असा अहवाल जिल्हाधिकार्यांनी सरकारला दिला आहे.
🚨 CET Exam Row: It appears the deliberate act of removal of students’ Janeu (sacred thread/Janivara) during the CET exam has now been uncovered!
Malpractice at Krupanidhi College revealed during the inquiry.
📌 The Bengaluru Urban DC has recommended that no further government… https://t.co/TvfGRDsg6j pic.twitter.com/atHGnatZ6M
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 27, 2026
१. या घटनेच्या प्रकरणी सरकारने आधीच कारवाई केली आहे. परीक्षा केंद्रावर अधिकार्यांना पाठवून सखोल चौकशी करण्यात आली असून कर्तव्यात कसूर करणार्या आणि विद्यार्थ्यांच्या भावना दुखावणार्या ३ कर्मचार्यांना निलंबित करण्यात आले आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी ही कठोर कारवाई करण्यात आल्याचे जिल्हाधिकार्यांनी स्पष्ट केले आहे.
२. विशेष म्हणजे गेल्या वर्षीही याच महाविद्यालयामध्ये अशीच एक अनुचित घटना घडली होती, ही धक्कादायक गोष्टही चौकशीत उघडकीस आली आहे. ‘गेल्या वेळीही अशीच तक्रार आली होती. त्यामुळे सविस्तर चौकशी अहवालाच्या आधारे अशा केंद्रांवर परीक्षा घेतल्या जाऊ नयेत, असा अहवाल मी सरकारला सादर केला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जगदीश यांनी दिली.
म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाईंग यांचे मुंबईत स्वागत !
Ramdas Athawale : (म्हणे) ‘हातभट्ट्या अधिकृत केल्यास सरकारला महसूल मिळेल !’
मुंबईत उबेरच्या चालकाकडून तरुणीशी गैरवर्तन
गोरेगाव येथे सरकारी भूमीवरील अवैध दर्गा भुईसपाट !
शासकीय कार्यालयांत ‘केवळ नामधारी’ ही मराठी भाषा अधिकार्यांची ओळख पुसण्यासाठी होणार प्रयत्न !
Khan Sir Coaching Firing : पाटलीपुत्र (बिहार) येथे प्रसिद्ध खान सर यांच्या शिकवणी वर्गावर आक्रमण