पुणे येथे विद्यार्थ्याची आत्महत्या; तिघांवर गुन्हा नोंद !

पुणे – ‘यशोतेज अकॅडमी’चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी समुपदेशन न केल्याने अवधूत बडे (वय १६ वर्षे) याने १० नोव्हेंबर या दिवशी वसतीगृहात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. खोलीत रहाणार्‍याचे ३ सहस्र रुपये चोरल्याचा त्याच्यावर आरोप होता. अकॅडमीतून काढण्याची धमकी वॉर्डन (प्रभारी अधिकारी) वसंत सरकटे यांनी त्याला दिली होती. यामुळे त्याने वरील प्रकार केला. या प्रकरणी पोलिसांनी अकॅडमीच्या संचालकांसह तिघांवर गुन्हा नोंद केला. तेजस पाटील (वय ३२ वर्षे), विकास पाटील (वय ३२ वर्षे) आणि वसंत सरकटे (वय ५५ वर्षे) अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत

संपादकीय भूमिका

समुपदेशनाचा अभाव आणि धमकी यांमुळे विद्यार्थी आत्महत्येस प्रवृत्त झाला. केवळ पैसे कमावण्याकडे लक्ष न देता विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीनेही संस्थाचालकांनी विचार करावा !