अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी अल्ताफ महेबुब कुरेशीला मरेपर्यंत जन्मठेप !

लातूर – जिल्ह्यातील देवणी तालुक्यात ६ वर्षांच्या बालिकेवर झालेल्या अत्याचार प्रकरणात उदगीर येथील अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाने आरोपी अल्ताफ महेबूब कुरेशी (वय २० वर्षे) याला नैसर्गिक मृत्यू येईपर्यंत जन्मठेप, तसेच ५० सहस्र रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली. जानेवारी २०२४ मध्ये घडलेल्या या घटनेत शेजारी रहाणार्‍या आरोपीने बालिकेला फसवून नेऊन तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचे उघड झाले होते. पीडितेच्या आईने देवणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. न्यायालयाने सर्व सूत्रांचा विचार करून आरोपीला पॉक्सो कायद्याच्या कलम ६ अंतर्गत दोषी ठरवले. निकाल देतांना न्यायालयाने म्हटले की, अशा गुन्ह्यांना कोणतीही सहानुभूती दाखवता येणार नाही. त्यामुळे आरोपीला मरेपर्यंत जन्मठेपेची कठोर शिक्षा सुनावण्यात आली.