उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन !

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार करतांना उजवीकडे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर

पंढरपूर – श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर येथे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दर्शन घेतले. या वेळी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी शाल आणि श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची मूर्ती देऊन त्यांचा सत्कार केला. या प्रसंगी रोजगार हमी योजना, फलोत्पादनमंत्री भरत गोगावले, आमदार तानाजी सावंत, मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, तसेच मंदिर समितीचे पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते.